Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील उद्योजकांशी संवाद साधणार

टाटा आणि अंबानींचाही सहभाग

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in राष्ट्रीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, आसामच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत अमेरिका, यूरोप, कॅनडा, कोरिया अशा २० देशांमधील बड्या कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वरिष्ठ अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातील नियामकही या बैठकीला उपस्थित राहतील. भारतातील अनेक मोठे उद्योजकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील उद्योजकांशी संवाद साधणार.

त्यात रतन टाटा, मुकेश अंबानी, नंदन नीलेकणी, उदय कोटक, दीपक पारेख आदी उद्योजकांचा समावेश असणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने भारताचं ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य, आर्थिक सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील उद्योजकांशी संवाद साधणार.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद 2020 चं आयोजन अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF)कडून करण्यात आलं आहे. शासकीय मालमत्ता निधी आणि निवृत्तीवेतन निधीसह जगभरातील सर्व प्रमुख गुंतवणूकदार या बैठकीत सहभागी असणार आहेत. या गुंतवणूकदारांकडे 6 हजार अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती आहे.

टाटा, अंबानींसारखे उद्योजकांचा सहभाग

या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, टाटा समुहाचे रतन टाटा, HDFCचे दीपक पारेख, सन फार्माचे दिलीप संघवी, इन्फोसिसचे नंदन निलेकणी आणि कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांसारखे अनेक दिग्गज उद्योजक सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बैठकीची प्रमुख उद्दिष्ट्ये

जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणे, भारताची आर्थिक स्थिती आणि गुतंवणुकींच्या संधींबाबत माहिती देणे, हे या बैठकीची प्रमुख उद्दिष्ट्ये सांगितली जात आहेत.

अजून वाचा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

Share post
Tags: All WorldBusinessmanMarathi NewsNarendra Modi NewsNew DelhiPM Narendra ModiPrime Minister Modi will host the Virtual Global Investor Roundtable Summit todayVideo Conferenceपंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगभरातील उद्योजकांशी संवाद साधणार
Previous Post

Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा

Next Post

पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव जाहीर ; जाणून घ्या दर

Next Post
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव जाहीर ; जाणून घ्या दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group