Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

गृहमंत्री अमित शहांच्या यांच्या संपत्तीत घट – PMO, पीएमओकडे जाहीर केली संपत्ती

by Divya Jalgaon Team
October 15, 2020
in राष्ट्रीय
0
modi

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे नव्याने दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.

दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची एफडी असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी होती.

त्याचबरोबर पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.

Share post
Tags: Amit ShahHome MinisterNew DelhiPM Narendra ModiPrime Minister Narendra Modi's wealth increased compared to last yearProperty
Previous Post

भाजपात प्रवेश करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी

Next Post

एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत

Next Post
Sai Tamhankar news

एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group