जगभरात अँड्रॉईडचे फोन सर्वाधिक वापरले जातात. ही ऑपरेटिंग सिस्टिम ओपनसोर्स असली तरीही ती गुगलची आहे. यामुळे बहुतांश अॅप ही गुगलचीच इन्स्टॉल असतात. असेच एक अॅप गुगल क्रोम ब्राऊझिंगसाठी वापरले जाते. या क्रोममध्ये मोठा बग सापडला आहे. यामुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असून गुगलने लवकरात लवकर अॅप अपडेट करण्यास सांगितले आहे.Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा.
अँड्रॉईड वापरणाऱ्यांना नेहमी मालवेअरची चिंता सतावत असते. गुगलला एखाद्या बगची माहिती मिळताच युजरला सावध केले जाते. आज पुन्हा एकदा गुगलने अँड्रॉईड वापरणाऱ्यांना वॉर्निंग देत गुगल क्रोम ब्राऊजर अपडेट करण्यास सांगितला आहे. या अपडेटमध्ये झिरो-डे बगचा पॅच देण्यात आला आहे. हा एक महत्वाचा अपडेट असून असे न केल्यास तुमची माहिती चोरी केली जाऊ शकते. तसेच यामध्ये बँकिंग संबंधी माहितीही धोक्यात येऊ शकते.
सर्च इंजिन कंपनी गुगलने सांगितले की, क्रोम ब्राऊझरमध्ये असलेल्या बगच्या वापरातून युजरला नुकसान केले जाऊ शकते. ZDNet ने दिलेल्या रिपोर्टनुसार हॅकर्सना क्रोम सिक्युरिटी सँडबॉक्स बायपास करण्याचा पर्याय मिळाला होता. असे केल्य़ास हॅकर्स युजरच्या मोबाईलमध्ये त्याच्या नकळत त्यांचे विद्रोही कोड रन करू शकत होते. तसेच अन्य अनेक बदलही करू शकत होते.
Trusted Contacts अॅप बंद
गुगल (Google) ने Trusted Contacts हे अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप अॅपल प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे. 1 डिसेंबर 2020 पासून या अॅपचा सपोर्टही बंद करणार असल्याचे गुगलने सांगितले. गुगलने गेल्या काही काळापासून फारशी वापरात नसलेली अॅप बंद केली आहेत. मात्र, ट्रस्टेड कॉन्टॅक्ट हे अॅप प्रसिद्ध होते. गुगलने याआधी गुगल लॅटिट्यूड गूगल+ लोकेशन शेअरिंग अॅप बंद केले होते. गुगल त्याची सेवा सुधारण्यासाठी चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट हे अॅप 2016 मध्ये लाँच केले होते. या अॅपद्वारे युजर त्यांच्या फेव्हरिट कॉन्टॅक्टसोबत डिव्हाईस अॅक्टिव्हिटी स्टेटस आणि लोकेशन शेअर करता येत होते. सुरुवातीला कंपनी बी सेवा केवळ अँड्रॉईड युजरसाठी देत होती. मात्र, नंतर हे अॅप iOS साठी अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध केले आहे.
अजून वाचा
बाईक टॅक्सी बंद करण्याची रॅपिडोला नोटीस