नवी दिल्ली : देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ३४ व्या दिवशी ‘जैसे थे’च ठेवले आहेत. करोना संकाटातून कमाॅडिटी बाजार सावरलेला नाही. सध्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. मतमोजणी सुरु असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिका कच्च्या तेलाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तेथील निकालांचा तेलाच्या बाजारपेठेवर परिणाम होण्याचा अंदाज जाणकांरानी व्यक्त केला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी सलग ३४ व्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी महिनाभरापासून देशातील इंधन दर ‘जैसे थे’च आहेत. पेट्रोलियम कंपन्यां या धोरणाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.