जळगाव, प्रतिनिधी । महिला व दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवन समर्पित करणारे , देशाला सत्यशोधक विचारांचा वारसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला व फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी मुकुंद सपकाळे (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा ), अमोल कोल्हे (जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ), हरिश्चंद्र सोनवणे, रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे, वाल्मिक सपकाळे, महेंद्र केदारे, राजू सोनवणे, महात्मा फुले समता परिषदेचे निवेदिता ताठे, संतोष इंगळे, सुभाष माळी, नंदू माळी, महानगरपालिकेचे चंद्रकांत वांद्रे, गोपी सपकाळे, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अजय पाटील, पंकज गरुड, किशोर पाटील, पद्माकर चौधरी,अजित चौधरी, मानव भालेराव आदी उपस्थित होते.