जळगाव, प्रतिनिधी । २७ वर्षीय तरूणाने घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील जुना आसोदा रोड येथील गोपाळपूरा येथील २७ वर्षीय तरूणाने घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीला आली. पत्नी व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
असोदा रोड येथील गोपाळपुरा भागात राहणाऱ्या पंकज उखर्डू खाचने (वय-२७) हा आपल्या आई व पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहे. पंकजची पत्नी ह्या दिवाळी निमित्त मुलासह दिवाळीला माहेरी गेल्या. त्यामुळे पंकज आणि त्याची आई कल्पना खाचने हे दोघे घरी होते. रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पंकजची आई कल्पनाबाई बळीराम पेठेत भाजीपाला विक्री करण्यासाठी गेल्या. त्यावेळी पंकज हा घरी एकटाच होता. पंकजने राहत्या घरात घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आई कल्पना ह्या दुपारी १२ वाजता घरी आल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकजने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला होता.
यावेळी शनीपेठ पोलीसांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. आत्महत्या करण्यापुर्वी पंकज खाचने यान दिड पानाची सुसाईड नोट लिहिली होती. यात पत्नी, शालक, पोलीस असलेले सासरे व सासू यांच्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. सुसाईड नोट पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.