भुसावळ, प्रतिनिधी । काही कर्मचारी कामावर रूजू झाल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एस.टी.फेर्या सुरू करण्यात आल्या असल्यातरी अज्ञातांनी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडल्याने खळबळ उडाली आहे.
भुसावळ आगारातून बोदवडकडे प्रवासी घेऊन बस निघाली असताना दीपनगर जवळ अज्ञात व्यक्तीने दगड मारून बसची पाठीमागील काच फोडल्याने प्रवाशांच्या गोटात भीती पसरली तर दुसरीकडे यावल-भुसावळ बसवरही दगडफेक करण्यात आल्याने बसच्या पत्र्याचे नुकसान झाले.
तब्बल 20 दिवसानंतर भुसावळ आगारातून भुसावळ-बोदवड बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल. 0947) बोदवडकडे निघाली असताना दीपनगरजवळ अज्ञाताने दगडफेक केल्याने बसचा पाठीमागील काच फुटला तर सुदैवाने प्रवाशांना कोणीतीही इजा झाली नाही. भुसावळ तालुका पोलिसांना याबाबची माहिती कळवल्यानंतर तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडेसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, भुसावळ-यावल बसवरही (एम.एच.20 बी.एल.2668) पाठीमागून दगडफेक केल्याने बसच्या पत्र्याचे नुकसान झाले.