जळगाव, प्रतिनिधी । दि. 30 ऑक्टोबर रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, डॉ. नितीन पाटील डॉक्टर कराळे, तुषार वाघुळदे, चेन्नईहून डॉक्टर बॅग उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना काळात रुग्णांची सेवा व पूर्ण जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुमैय्या शेख यांना खान्देश गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.