जळगाव, प्रतिनिधी । लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्यास संशयित आरोपीला आज शहरातील नवीन बसस्टॅन्ड येथे जिल्हापेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या दिवाळी सना निमित्त जळगाव बस स्टँडवर प्रवाशांची गर्दी असलेने प्रवाशी नामे जिशान अशपाक पिंजारी अमळनेर हे शिक्षणासाठी नांदेड येथे गेले होते ,नांदेड येथून अमळनेर येण्यास जळगाव येथे येऊन बस स्टॅन्ड वर आले,त्यांचेकडे 4 बॅग होत्या त्यांची अमळनेर बस संध्याकाळी 19/30वाजता आली परंतु त्यांना 4 बॅग पैकी तीनच बॅग दिसल्या कोणीतरी त्यांची बॅग नेल्याचे त्यांचे लक्ष्यात आलेने 3 बॅग घेऊन अमळनेर येथे गेले असता, नमूद चोरटा रेल्वे स्टेशन जळगाव येथे बॅग सह संशयास्पद स्थितीत आढळून आलेने व नमूद बॅग कोठून आणली व कोणाची आहे. याबाबत रेल्वे पोलीस चौकी जळगाव चे PSI राजेंद्र पाटील, ASI राजेश पुराणिक, हे कॉ सचिन पाटील याना दिसून आलेने रेल्वे पोलिसांनी, जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला असल्या पो कॉ जुबेर तडवी हे कॉ साहेबराव खैरनार यांनी रेल्वे चौकी जळगाव येथे जाऊन लॅपटॉपसह बॅग असलेले इसमास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बब्बू भय्यालाल धुर्वे (वय 39) रा. उमरखेडा खुर्द ता.जि. छिंदवाडा MP असे सांगितले आहे. नमूद बॅग बाबत काही एक सांगत नव्हता,नमूद बॅगची बारकाईने पाहणी केली असता बॅगमध्ये AVITA कंपनीचा लॅपटॉप व नाव मोबाईल क्रमांक असलेली चिठ्ठी आढळून आलेने पोलिसांनी तात्काळ नमूद मोबाईल वर संपर्क साधला व बॅग व लॅपटॉपची फोटो पाठविले असता फिर्यादी यांनी ओळ्खलेने त्यांना तात्काळ जळगाव येथे बोलाऊन घेतले व नमूद लॅपटॉप बॅग बस स्टॅन्ड वरून चोरल्याची फिर्यादीची यांची खात्री झालेने नमूद चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी नमूद चोरत्यास लॅपटॉप व बॅग सह ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली API महेंद्र वाघमारे,पो ना संदीप पाटील करीत आहे,नमूद आरोपीस अटक केली आहे.