Wednesday, March 11, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी केली अटक

by Divya Jalgaon Team
October 31, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगाव प्रतिनिधी । २५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून २६ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-५२) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घराच्या बाधकांमासाठी दुचाकी (एमएच १९ सीसी २०७७) ने गेले.

त्यावेळी त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी लावून बांधकामच्या ठिकाणी निघून गेले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेत असतांना शहरातील अजिंठा चौकात अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा हा संशयास्पद हालचाल करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे व योगेश बारी आदींनी कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता संशयिताने वासूदेव जोशी कॉलनीतून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Share post
Previous Post

शिवशंभु संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुखपदी बंटी ताडे

Next Post

लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या संशयिताच्या जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

Next Post
लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या संशयिताच्या जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या संशयिताच्या जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group