जळगाव,प्रतिनिधी । आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी धरणगाव तालुका येथील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे दिवाळी फराळ व साड्या वाटप करण्यात आल्या.
यात शेवचिवडा, मोहनथाल, शंकरपाळे, व महिलांना साड्या यांचा समावेश असुन संजय भिल, काशिनाथ भील, मगन भील, अभिमन पिंपळसे , चंद्रभागा निकम, कमलबाई भील, रावली बारेला, दीपाली मोरे, चंदा भील, ममता बारेला अशा 150 कुटुंबाना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी महापौर मा जयश्रीताई महाजन जिल्हा परिषद सदस्य मा माधुरीताई अत्तरदे, नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सरपंच ईशाताई बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सदस्य मनोज सोपान अत्तरदे, सदस्य चंद्रलेखा सतीश पवार सदस्य भूषण बऱ्हाटे, सदस्य आशा संजय कोल्हे, ग्रामविकास अधिकारी श्री तुकाराम मराठे, पोलिस पाटील निसार पटेल ,संजय कोल्हे,नारीशक्ती ग्रुपच्या सुमित्रा पाटील, ज्योती राणे ,ॲड सीमा जाधव, भावना चौहान, सौ नूतन तासखेडकर, किर्ती पाटील विशाल भावसार कल्याणी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आली गावातील दीपक भालेराव , किशोर बोरोले, किरण फालक यांचे अनमोल सहकार्य लाभले. सुत्रसंचलन साळवा येथील शिक्षीका व नारीशक्ती ग्रुपच्या श्रीमती ज्योती राणे यांनी केले.आभार तुकाराम पुंडलिक मराठे ग्रामविकास अधिकारी यांनी मानले.