जळगाव – भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने या नेत्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.