जळगाव, प्रतिनिधी । नवरात्रीच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी यांच्यामार्फत करण्यात आला. आ. प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सुचनेनुसार करण्यात आला.
यावेळी या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला. सविता भास्कर नारखेडे-शेतकरी, शैलजा निकम- सहकार क्षेत्र, विजया पाटील – बॅकीग आॅफिसर, कल्पना वसाने- सामाजिक क्षेत्र, मयुरी भाऊसाहेब कर्पे- आशादीप अध्यक्ष, शोभा यशवंत हांडोरे-समुपदेशक, विद्या सुधाकर सोनार- शिक्षीका, जयश्री सुभाष पाटील-रिमांडहोम, मनीषा अनिल बागुल- जळगाव, सुवर्णलता अडकमोल आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.