जळगाव, प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी खिरोदा प्र. या. तालुका रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रमेश चौधरी (खिरोदा प्र.या., ता. रावेर) यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मंगलाताई सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, प्रतिभा भालेराव, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे , नेमाडे , सोनवणे , मोतीराडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
नितीन चौधरी हे केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांनी काँगेसच्या युवक जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री धनाजी येळकर पाटिल, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, लेवा पाटीदार महामंडळाचे मधुकर भंगाळे, किशोर बोरोले (चिनावल), ऍड. संदीप भंगाळे (सावदा), एम. ए. खान , डॉ. प्रकाश पाटिल (तांदलवाडी), योगेश सिताराम पाटिल आदींनी अभिनंदन केलेले आहे .