जळगाव, प्रतिनिधी । महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी स्वेटर व चष्मे वाटप नारी शक्ती ग्रुप अध्यक्ष जळगाव मनीषा पाटील व सुमित्रा पाटील यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
आज दिनांक 2 ऑक्टोबर शनिवार रोजी नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष सौ मनीषा पाटील तसेच सदस्य सुमित्रा पाटील यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने मा महापौर जयश्रीताई महाजन ,मनपा उपायुक्त मा श्याम गोसावी, भरारी फाउंडेशन अध्यक्ष मा श्री दीपक परदेशी या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. मनीषा पाटील व सुमित्रा पाटील यांनी आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय संस्था बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांची गरज काय आहे हे जाणून घेण्यासाठी संवाद साधून सर्वेक्षण केले. त्यातून त्यांना स्वेटरची खूप गरज आहे हे निष्पन्न झाले.म्हणून दोघींनी आर्थिक पाठबळ देऊन स्वेटर खरेदी केले. हे स्वेटर मा. महापौर जयश्रीताई महाजन यांच्या शुभ हस्ते चमेलीबाई सुरवाडे, यमुना खैरनार, आशा अडकमोल, सावित्री लोहार, पोर्णिमा, विमल पवार, मंजुळा चौधरी,मीना चौधरी, शांताराम राखुंडे, नम्रता भदाणे, शकुंतला पाटील यांच्यासह एकूण ३४ जणांना वाटप करण्यात आले. तसेच नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या नारीशक्ती ग्रुप तर्फे नारीशक्ती ग्रुप तर्फे मांगीलालजी बाफना नेत्रपेढीद्वारा झालेल्या नेत्रदान तपासणी होऊन मा उपायुक्त श्याम गोसावी साहेब व भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी यांच्या शुभहस्ते १८ जणांना चष्मे वाटप करण्यात आले डोळ्याच्या ऑपरेशन साठी ८ जणांसाठी पुढील कार्यवाही महापौर जयश्रीताई महाजन यांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आली. याप्रसंगी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी मनोगत मांडले. मा उपयुक्त श्याम गोसावी साहेब यांनी गांधी जयंतीच्या औचित्याने स्वच्छतेचे महत्त्व त्याबद्दल मार्गदर्शन आपल्या मनोगतातून केले.
महापौर जयश्रीताई महाजन यांनी मनीषा पाटील व सुमित्रा पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करून नारीशक्ती ग्रुपच्या सदैव पाठीशी असून काही गरज असेल तर मदत करण्याचे आश्वासन देऊन नारीशक्ती ग्रुपमध्ये मला सुद्धा समाविष्ट करा असे ताई म्हणाल्या. यानंतर सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्ष साजरे करीत असताना जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित्रा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी तर आभार ॲड सीमा जाधव यांनी मानले. चष्मे तयार करण्यासाठी नूतनताई तास खेडकर, भारती म्हस्के, आरती व्यास ,ज्योती राणे, मनीषा पाटील ,सुमित्रा पाटील यांचे आर्थिक सहकार्य लाभले. याप्रसंगी नारी शक्ती ग्रुपच्या भावना चौहान, सविता नंदनवार ,रेणुका हिंगू, भारती कापडणीस, ॲड वैशाली बोरसे उपस्थित होत्या.