जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईस्ट आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विदयमाने “डायबेटिस ला हरवू या” या मोफत शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कांताई रुग्णालयात करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णांची शुगर लेव्हल, शुगर लेव्हल जास्त असल्यास जास्त झालेल्या शुगर ला नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांची मोफत तपासणी फिजिशियन डॉ.मंदार पंडित, तसेच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर आणि नेत्र तपासणी कांताई रुग्णालयातील डॉक्टर करतील. गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईस्ट चे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता आणि कांताई नेत्रालयाचे अमर चौधरी यांनी केले.