जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप जळगाव जिल्हा व टायगर जामनेर कडून चाळीसगाव येथे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
शहरातील तितुर व डोंगरी नदीला पूर आल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघडल्यावर आले आहेत या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून टायगर ग्रुप कडून नेहमी एक हात मदतीच्या मदतीच्या माध्यमातून धावून येणाऱ्या टायगर ग्रुप संघटना खानदेश विभाग यांच्याकडून मदत माध्यमातून दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात आले होते. त्यातून तात्काळ ही मदत पुरामुळे बाडीत कुटुंबातील व्यक्तींना येथील घरोघरी साहित्य वाटप करण्यात आले 400 किट व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव ,व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव ,टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर ,बुलंद आवाज व्यक्तिमत्व सागर भाऊ कांबळे ,व जळगाव जिल्ह्याचे प्रमुख सदस्य गौरव भाऊ उमप, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातून व जामनेर तालुका यांच्याकडून अन्नधान्य व चटाया चे 400 किट चाळीसगाव तालुका पुरग्रस्त लोकांना वाटप करण्यात आले टायगर ग्रुप अधिकारी व सदस्य खान्देश जिल्हा गौरव भाऊ उमप, सागर भाऊ सपके, मनोज बाविस्कर ,राहुल उमप ,विवेक नेतले ,गजानन भाऊ पाटील, सचिन सोनवणे ,सोपान मानकर ग्रामपंचायत चिंचोली चे सध्यक्ष आनंद घुगे, अंकुश मराठे जितू निंबाळकर ,अजय शिरसाठ ,गणेश गोपाल, रवींद्र पाटील, वैभव शिरसाट ,विशाल कोरोशिया ,तसेच जामनेर टायगर ग्रुपचे सदस्य आकाश चौधरी ,धीरज पर्वते ,धनंजय सोनवणे, सदस्य उपस्थित होते