चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी जाऊन त्याला रंगेहाथ अटक केली आहे.
नेम चाळीसगाव शहर पोलीस स्थानक सरकारतर्फे शैलेंद्र आत्माराम पाटील फिर्याद देतो की मी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या 02 वर्षापासुन नेमणुकीस आहे. आज दि.13 सप्टेंबी रोजी चाळीसगाव शहरात पोलीस निरीक्षक के.के पाटील यांच्या आदेशाप्रमाणे दिवसा गस्ती करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याने सपोनि कापडनीस ,सफौ.2727 अनिल अहिरे, पो.काँ.2367 अमोल भोसले असे खाजगी वाहनाने रवाना झालो. त्यावेळी गोपनिय माहीती मिळाली की, चाळीसगांव शहरातुन हद्दपार करण्यात आलेला इसम अक्षय भानुदास पाटील हा चाळीसगांव शहरात बस स्टड चे पाठीमागे फिरत आहे.
त्यानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी रवाना झालो बस स्टड परीसरात गोपनिय बातमी दार याचे मार्फत माहीती घेतली असता अक्षय पाटील हा स्वराज व्हास्पीटल चे समोर 11/30 वा सुमारास उभा दिसला त्यास मा.उपविभागीय दंडाधिकारी सो, चाळीसगाव यांचे आदेश क्रं. दंडप्र/हद्दपार/क्र.03/2022 दि. 28/07/2021 अन्वये मुंबई पोलीस कायदा कलम 56(अ) नुसार त्याच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई म्हणुन दि.02/8/2021 रोजी जळगाव, नाशिक, औरंगाबाद, धुळे नंदुरबार जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधी पावेतो तडीपार करण्यात आलेले होते. त्याबाबत सदर इसम यास आदेशाची बजावणी करण्यात आली होती असे असतांना सदर तडीपार इसम हा तडीपार आदेशाचा भंग करुन कोणतीही पुर्व परवानगी न घेता बेकायदेशिररित्या चाळीसगाव
शहरात मिळुन आला म्हणुन त्यास आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले आहे. तरी आज दि.13/09/2021 रोजी 11/30 वाजता चाळीसगाव शहरातील स्वराज व्हास्पीटल चे समोर जळगाव जिल्ह्यातुन दोन वर्षे कालावधी करीता मा.उपविभागीय दंडाधिकारी सो, चाळीसगाव यांनी दि.28/7/2021 रोजीच्या आदेशान्वये हद्दपार केलेला आरोपी मचकुर अक्षय भानुदास पाटील वय 24 वर्षे, रा.लक्ष्मी नगर चाळीसगाव याने हद्दपार आदेशाचा भंग करुन हद्दपार कालावधीत बेकायदेशीरपणे चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे मिळुन आला म्हणुन माझी त्याचे विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.