Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्हा कारागृहातील महिला कैदीचा आत्महत्येचा प्रयत्न

by Divya Jalgaon Team
September 13, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगाव जिल्हा कारागृहातील महिला कैदीचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कारागृहात असलेल्या महिला कैदीचा आज पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अनिता चावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता राजा चावरे वय ५० या महिलेेने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत आहेत. कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली.

याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा मुरलीधर भोम्बे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता चावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न का केला त्याचे कारण कळू शकलेले नाही. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

Share post
Previous Post

टायगर गृप जळगाव जिल्ह्याच्यावतीने चाळीसगाव पूरग्रस्तांना मदत

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group