Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

जळगाव जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश

by Divya Jalgaon Team
September 11, 2021
in जळगाव, सामाजिक
0
किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

जळगाव – कोरोना काळात भजन किर्तन बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले होते. त्यामुळे किर्तनकार,टाळकरी यांना आर्थिक मदत मिळावी अशी शासनाला जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर दि ६ मे रोजी मागणी केली होती तसेच मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना इमेलद्वारे मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या कलावंतांना महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

कोरोना काळात राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

आता श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना आर्थिक मदत देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच दिलासादायक असल्याचे, यावेळी रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी सांगितले.

Share post
Tags: #Kirtankar The government will pay an honorarium of five thousand rupees#mukhymantri udhaw thakre#Rohini Khadse#upmukhyamantri Ajit pawar
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Next Post

जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अखेर राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे 

Next Post
धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तूल हस्तगत ; तालुका पोलिसांची कारवाई

जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अखेर राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group