जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (महानगर ) अभिषेक पाटील यांनी आज पदमुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अर्ज दिले असून त्यात त्यांनी म्हटले कि ,
जळगाव शहर विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर १७ महिन्यापासून मी या पदावर कार्यरत आहे . परंतु स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. त्यामुळे मला यापदावरून मुक्त करावे असे पत्र अभिषेक पाटील यांनी दिले असून जयंत पाटील यांनी त्यांच्याकडून तडकाफ़डकी राजीनामा मागितलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या जागी खडसे समर्थक अशोक लाडवंजारी यांना जिल्हाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.