जळगाव – निसर्गाचे रौद्ररुप आपण पाहत आहोतच. यातून वाचण्यासाठी छोटे छोटे प्रयत्नाव्दारे कार्य करीत राहणे गरजेचे आहे. गणपती हे आपले लाडके आराध्य दैवत आहे. गणेशोत्सवात पीओपीची मुर्ती न घेता शाडु मातीची मुर्ती घेणे हाही तसाच एक छोटा पर्यावरणपूरक प्रयत्न आहे.
दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेतर्फे बचत गट सदस्यांना तसेच त्यांच्या मुलामुलींना शाडुच्या मातीव्दारे गणेशमुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दि.31.08.2021 रोजी यशवंतराव मुक्तांगण सभागृह जळगाव येथे देण्यात आले. अजेता महिला बचत गटाच्या सौ.वंदना चौधरी यांनी आपल्या अमुल्य मार्गदर्शनाखाली सदस्यांना व मुलामुलींना मुर्ती बनविण्यास शिकवीले.
सदर प्रशिक्षणास बचत गट विभाग प्रमुख सौ. शुभश्री दप्तरी व इतर कर्मचारी उपस्थित होते, तसेच बचत गटांतील महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली. प्रशिक्षणाव्दारे सदस्यांनी व मुलामुलींनी गणपतीचे विविध लोभस प्रतिमा दर्शविणार्या मुर्ती साकारल्या.