चोपडा – चोपडा श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,( श्रीराम नगर) चोपडा, जिल्हा – जलगांव, महाराष्ट्र येथे दि.3/ 9/ 20 21 रोजी चोपडा येथे चहार्डी तालुका चोपडा येथील श्री, अनिल तुळशीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ विजयाबाई अनिल चौधरी तसेच श्री रघुनाथ त्र्यंबक चौधरी चोपडा व त्यांच्या धर्मपत्नी सौ चंद्रकलाबाई रघुनाथ चौधरी यांच्या शुभहस्ते , श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरात हरिपाठ निमित्त आरती करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ह भ प गोपीचंद महाराज , संस्थेचे सह सचिव श्री तथा प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी त्यांच्या धर्मपत्नी सौ नम्रता प्रशांत चौधरी ,निशांत चौधरी ,श्रीकांत चौधरी, प्रकाश श्रावण चौधरी, विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी, ह भ प तेजस महाराज, ह भ प ज्ञानेश्वर राजाराम आप्पा नेरकर, विश्वस्त तथा महाराष्ट्र सन्ताजी प्रतिष्ठान चोपडाचे अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी ,मदन मिस्तरी, अशोक भाईदास पाटील ,गौरव पाटील जगदीश मिस्त्री, श्रीमती कलाबाई सुभाष चौधरी, कुमारी सुजाता संजय पाटील ,तनिषा धनराज शेलार ,दुष्यंत चौधरी बालगोपाळ मंडळी उपस्थित होते.
यावेळी अविनाश अनिल चौधरी यांनी बीटेक इंजिनियर पदवी संपादन केली व त्यांच्या भगिनी कुमारी शितल अनिल चौधरी यांनी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले म्हणून त्यांचा चोपडा तेली समाजातर्फे व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. त्याबद्दल गुणवंतान्चे संस्थेचे अध्यक्ष श्री के .डी .चौधरी उपाध्यक्ष श्री टी. एम. चौधरी सर आदी मनःपूर्वक अभिनंदन केले.