जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथे गोपाळ समाजहित महासंघ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वावडदा ता.जि.जळगाव दि.२९ रोजी वावडदा येथे गोपाळ समाजहित महासंघ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पालकमंञी गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी रमेश पाटील जळके, धनंजय सोनवणे, रविंद्र कापडणे, सरपंच राजेश वाडेकर, उपसरपंच कमलाकर पाटील, आप्पा पवार, सुमित पाटील, गोपाळ समाजचे जिल्हा अध्यक्ष ग्यानदेव भोर, उपाध्यक्ष सुकदेव जाधव, जळगाव ता.अध्यक्ष प्रकाश गजाकुरा, उपाध्यक्ष शांताराम जाधव, गोरख नवघरे, पो पाटील विनोद गोपाळ, मुकुंदा पाटील, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जाधव, अमोल जाधव, रक्त सक्रमक अधिकारी डाॅ. उमेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी वावडदा येथुन ३५ रक्त दात्यानी रक्तादान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले.