चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव नगरपालिकाच्या नगरसेविका सविता राजपूत यांचे पिताश्री कै. सत्यवान राजपूत यांच्या १७ व्या स्मृतीदिनाप्रीत्यर्थ जय बाबाजी चौकात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार आणि पार्श्वगायक मुकेश यांच्या सुरेख गाण्यांच्या (मैफिलीच्या) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर युवा ,उद्योजक योगेश अग्रवाल चाळीसगाव ,न.पा.चे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील ह. भ.प. ए. बी. पाटील ,राजपूत समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय सिंग राजपूत स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षी निकम , देशदुतचे पत्रकार मनोहर कांडेकर , दै. बाजीरावचे पत्रकार सुनील राजपूत, हिंगोण्याचे सरपंच कपिल पाटील,पत्रकार रामराव चौधरी नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, मा. मुख्या. अरुण पाटिल,जिजाऊ समितीच्या अध्यक्ष सोनल साळुंके हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुचित्रा पाटिल व जाधव परिवारातील श्री. देवसिंग राजपूत, संभाजी राजपूत, शिवाजी राजपूत, मच्छिंद्र राजपूत,श्रीमती रमाबाई राजपूत, कमलबाई राजपूत, कोकिलाबाई राजपूत, रेखाबाई राजपूत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता राजपूत यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. वडिलांनी आमच्यावर जे काही संस्कार केले आम्हाला जगण्याची दिशा दिली त्यांनी दिलेले विचार मैफीलीतून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कारातून चिरंजीवी व्हावेत यासाठी आपल्या कुटुंबाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सविता यांनी सांगितले. मीनाक्षी निकम यांनी मनोगत व्यक्त करताना बाप समजून घेणे अत्यंत अवघड असल्याचे सांगितले बापाची व्याख्या करता येत नाही आणि बापाने केलेले उपकार देखील फेडता येत नाही सविता व यांच्या कुटुंबावर बापूसाहेबांनी जे काही संस्कार केलेले आहेत त्या संस्काराप्रती आपल्या भावना चेतन करण्याचा या कुटुंबाचा हा प्रयत्न बापाचे व्यक्तिमत्व समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न असल्याची मीनाक्षी निकम म्हणाल्या. कै. बापूजींनी आपल्या कुटुंबाला चे आदर्श दिले त्या आदर्शामुळेच आज सविता प्रशांत प्रदीप आपापल्या परीने समाजामध्ये काम करीत आहेत हे तिघेही समाजामध्ये फक्त कामच करत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जोपासत आहे सविताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाचा एक वेगळा कसा समाजापुढे निर्माण केला आहे तिच्या कामातून आणि कार्य समाजाला प्रेरणा मिळत आहे बहिणीच्या कामाची जबाबदारी सांभाळण्याचे काम प्रदीप, प्रशांत देखील अतिशय जबाबदारीने करत असल्याचे किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले. उपस्थित सर्व मान्यवरांचे जाधव परिवाराच्यावतीने प्रशांत, प्रेमसिंग, किरण, प्रदीप, राहुल, अर्जून ,करण, कुणाल, कविता व सविता राजपूत (जाधव) यांनी स्वागत केले. विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला मेरा गाव मेरा तीर्थ टीम चे विजय शर्मा, खुशाल पाटील, कोरोना काळात रुग्णांना मोफत भोजन देणारे दानशूर वर्धमान धाडीवाल टीमचे दिलीप घोरपडे, मुराद पटेल, मिशन 500 कोटी लिटर टीमचे शेखर निंबाळकर, तुषार निकम, एकनाथ माळदकर , आरस्था माळतकर ,भूजल अभियान टीमचे राहुल राठोड, सविता राजपूत, योगेश राठोड,जलमित्र परिवाराचे सोमनाथ माळी शशांक अहिरे ,चला माणूस होऊ या टीमचे विकी पाटिल, सुजाता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला शीघ्र कवी रमेश पोतदार, डॉ. मंगेश वाडेकर, सुनील राजपूत, रामराल चौधरी, प्रकाश चौधरी, गायत्री चौधरी, निर्मला पवार, स्नेहल सापनर, ग्रिष्मा पिंगळे, निलेश राजपूत, सत्यजित ब्रम्हणे, अरुण जाधव, ॲड हातलेकर,विकी शिंपी, सोमेश्वर कासार यांच्यासह उपस्थित गायकांनी मुकेश यांची गाणी म्हटली जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी प्रचंड उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शालिग्राम निकम व संगीता देवी मॅडम यांनी केले.