पाचोरा प्रतिनिधी – भुसावळ नगरपालिका येथे नवनियुक्त मुख्य लेखापाल आणि अतिरिक्त पदभार डेप्युटी मुख्याधिकारी सुदर्शन रमेश शामनानी यांची नियुक्ती झाली त्यानिमित्त त्यांनी त्यांचे गुरुजी कै. किसन आनंदा पडोळ (पडोळ गुरुजी) यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आले होते.
तेव्हा पाचोरा येथे येऊन असे समजले की गुरुजी स्वर्गवासी झाले हे वाक्य ऐकून खूप दुःख झाले असे श्यामनानी यांनी सांगितले तेव्हा गुरुजींच्या पत्नी द्रोपदाबाई पडोळ यांची भेट घेतली तेव्हा मन सुन्न झाले होते तसेच त्यांच्याशी काय बोलू हे समझत नव्हतं.
तरी ही डेप्युटी मुख्याधिकारी सुदर्शन रमेश शामनानी यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा करून देताना सांगितले की मी आज पर्यंत पोहोचलो ते गुरुजी ने मला दिलेल्या शिक्षण, संस्कार आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच त्याचे कारण मी सिंधी समाजात जन्मलो असल्यामुळे मला मराठी भाषा येत नव्हती मराठीचे वाक्यरचना मला जमत नव्हते तरी मला समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करून गुरुजींनी मला शिकविले.
आदर्श शिक्षकांमध्ये हे गुण असायला पाहिजे ते सर्व गुण गुरुजी मध्ये आम्हाला दिसायचे म्हणून आम्ही सर्वजण त्यांना आदराने गुरुजी म्हणायचं अशा असंख्य आठवणींना त्यांनी उजाळा करून दिला यावरून श्याम माने यांचे गुरुजी प्रति प्रेम आम्हाला सर्वांना दिसले, या सर्व आठवणी सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले श्यामनानी यांचे गुरुप्रती आदर म्हणून त्यांनी गुरु पत्नी द्रोपदाबाई पडोळ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.