चोपडा – श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे दि. 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी शिक्षक, पत्रकार ,समाज सेवक, पुरस्कार प्राप्त गुणवंत जन, गुणी विद्यार्थी, संतजन यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्हा तेली समाज महासन्घाचे अध्यक्ष के. डी. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा सूतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास बापू पाटील,मा.उप नगराध्यक्श हितेंद्र देशमुख, वेब पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित जैन्, नगरसेवक भैय्या महेश पवार ,चोपडा शिवसेना अध्यक्ष रामचन्द्र आबा देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवल, चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, अशोक साळुंके,आदर्श शिक्षक व पत्रकार संजय सोनवणे , पत्रकार महेश शिरसाठ, ह भ प बापू महाराज लासूरकर, ह-भ-प गोपीचंद महाराज सुंदरगरि चोपडेकर, ह भ प विठोबा महाराज, ह भ प विजय महाराज, मनोहर पाटील, धनंजय पाटील, संगीता प्रकाश चौधरी , वैशाली विनोद चौधरी ,कुंदनलाल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष के. डी. चौधरी ,उपाध्यक्ष टी. एम. चौधरी , सचिव बी.के. चौधरी ,विश्वस्त प्रशांत चौधरी ,राजेंद्र चौधरी, नारायण चौधरी, देवकांत चौधरी ,महेंद्र चौधरी आदींनी केले.
यावेळी वेब पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ललित भाई जैन व अन्य पत्रकार बंधूंचा विविध पदांवर निवड झाल्याने कोरोनाच्या काळात उत्तम सेवा दिल्याने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. आर डी पाटील , चंद्रकांत पाटील ,एस .आर. सोनवणे, श्रीकान्त नेवे,तुषार पाटील ,संदीप ओली, सचिन जयस्वाल, श्याम भाऊ जाधव, महेश शिरसाट ,डॉक्टर सतीश भदाने ,महेश पाटील ,मिलिंद सोनवणे, अनिल पालीवाल, छोटू वारडे ,रवींद्र पाटील , डी .बी .पाटील, विश्वास वाडे, संजय बारी , राजेंद्र पाटील ,कैलास बाविस्कर, आत्माराम पाटील, हेमंत गायकवाड, मिलिंद वाणी आदी पत्रकारांचा माजी आमदार कैलास बापू पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला असून गुरुजनांचा गौरव यावेळी करण्यात आला.