जळगाव, प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने परिषद की पाठशाला या उपक्रमात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशभरात ग्रामीण व शहरी वाड्या वस्त्यांवर जाऊन अभाविपचे कार्यकर्ते १ जुलै पासून “परिषद की पाठशाल” उपक्रम राबवीत आहे. गेल्या दीड वर्षापासून शाळा व कॉलेज प्रत्यक्ष बंद असल्यामुळे ग्रामीण वस्त्यावरील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक समस्या येत होत्या, तसेच ऑनलाइन शिक्षणा करिता लागणारे साहित्य मोबाईल, संगणक व इंटरनेटची उपलब्धता नसल्या किंबहुना ते परवडणारे नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.ह्याच अनुषंगाने विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला उपक्रमाच्या माद्यमातून जळगाव मधील 05 वस्त्यांवर उपक्रम राबवीत आहे.
अभाविप जळगाव महानगराच्या वतीने कांचन नगर येथे गेल्या 14 दिवस पासून परिषद की पाठशाला चालवली जाते. त्यात आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन विद्यार्थी परिषदे तर्फ करण्यात आलेले होते.
त्यात चिमुकले विद्यार्थी वारकरी वेशात विठ्ठलाच्या नामघोषात दंग होऊन उत्साहात पावलीच्या तालावर नाचत तिथे जागेवरच मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठलाच्या व रुख्मिणीच्या रुपात विद्यार्थी हातात टाळ मृदुंग घेऊन विद्यार्थी घेऊन नाचतांना बघायला मिळाले सारा परिसर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात न्हाहून निघाला होता. विद्यार्थ्यांनी भावगीते देखील म्हणून तेथील आनंद द्विगुणित केला. त्यांनतर विद्यार्थ्यांना शेंगदाना चिक्की वाटप करण्यात आली. यावेळी भाग्यश्री कोळी, रितेश महाजन, चिराग तायडे, दुर्गेश वर्मा व मीनल पटेल उपस्थित होत्या.