जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज दिवसभरात ११ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३९ हजार ८५६ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर १०९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.