जळगाव – इदगाह मैदानावर पुनश्च लोकांचा जनसागर ईद च्या नमाजासाठी येउ दे, अल्लाह आता कोरोना चे संकट नष्ट कर, आमच्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला निरोगी आयुष्य जगू दे, देशात व जगात शांती व सौजन्य लाभू दे, मानव जातीला एकमेकाचे सहकार्य करण्याची सुबुद्धी देवो अशी प्रार्थना आज ईद उलअझहा च्या नमाज नंतर घरोघरी व मर्यादित संख्येत मशिदीमध्ये करण्यात आली.
इदगाह मैदानापासून भाविक वंचित
ईद उल फितर व ईद उलजहाँ म्हणजेच रमजान व बकर ईद यांची नमाज ईद गाह मैदानावर पढण्याचे अनन्य साधारण महत्व इस्लाम धर्मात असून मागील दोन रमजान ईद व दोन बकर ईद अशा चार नमाज या कोरोनामुळे ईदगाह मैदानावर न झाल्याने जळगाव कर नव्हे तर संपूर्ण भारत व जगातील मुस्लिम हे पुण्य पासून वंचित राहिल्याने आज सर्वदूर अल्लाह कडे मुस्लिम समुदायाने साकडे टाकले असून आतातरी हा कोरूना दूर कर अशी प्रार्थना दुवा करताना आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
बुधवार हा ईद उलअझहा अर्थातच कुर्बानी चा सण असल्याने सकाळी मुस्लिम वस्तीतील गल्लोगल्लीत व घराघरात नमाज पठण करण्यात आले व प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांसह इद ची नमाज अदा केली व अल्लाकडे प्रार्थना केली.
जळगाव मुस्लिम इदगाह व कबरस्तान ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सुद्धा आपल्या हाजी अहेमद नगर येथील राहत्या घरी आपल्या अपनी गल्ली तील मर्यादित सहकार्यांसोबत त्यात अताउल्लाह खान,वसीम मिर्झा,अडव्होकेट जुबेर खान,अडव्होकेट आमीर शेख, उमर शेख, अली उमर व कुटुंबीया सोबत नमाज अदा करून प्रार्थना केली.
ईद मुबारक- ईद मुबारक म्हणून शुभेच्या*
लहान बालके,महिला व पुरुषांनी एक मेकांच्या घरी जाऊन शुभेच्या दिल्यात तर कुर्बानी केलेल्या वाट्यातून एक वाटा गरीब लोकांना वाटप करण्यात आले.