जळगाव, प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या आरोग्य सेवक पदी सोमनाथ नारायण माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी च्या आरोग्य सेवक पदी सोमनाथ नारायण माळी यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष अँड-संदीपभैय्या पाटील यांच्या सुचनेवरुन आज माननिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष मनोज डिंगबर चौधरी यांनी नियुक्ती पत्र दिले सोमनाथ माळी यांच्या हातुन तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा व्हावी हिच अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली यावेळी प्रमोद गंगाधर घुगे , समाधान प्रकाश पाटील ,सागर कुंटबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते .