पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चा पदग्रहण समारंभ काल दिनांक १० जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला. येथील स्वप्नशिल्प रेसिडेन्सी बँक्वेट हॉलच्या सभागृहात संपन्न या पदग्रहण समारंभ प्रसंगी नूतन अध्यक्ष रोट. डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी अध्यक्षपदाची तर रोट. डॉ. प्रा. पंकज शिंदे यांनी सचिव पदाची सूत्रे स्वीकारली.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत येणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव च्या पदग्रहण समारंभ प्रसंगी उपप्रांतपाल रोट. डॉ. गोविंद मंत्री हे विशेष अतिथी म्हणून तर रोट. डॉ. सुजित परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रोट. डॉ. प्रशांत पाटील यांनी नूतन अध्यक्षांना पदाची कॉलर, पिन व चार्टर देऊन पदभार दिला, तर मावळते सेक्रेटरी रोट. डॉ. अमोल जाधव यांनी नूतन अध्यक्षांना पदाची पिन देऊन पदभार सोपवला. या पदग्रहण सोहळ्याला ज्येष्ठ रोटेरियन व उपप्रांतपाल राजेश मोर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. Covid-19 साथ रोगात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, विशेष आमंत्रित व परिसरातील विविध सामाजिक – शैक्षणिक संस्था संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्थानिक क्लबचे जेष्ठ सदस्य रोटेरियन राजेश मोर यांची असिस्टंट गव्हर्नर (AG) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झालेले रोटे. डॉ. भूषण मगर , रोटे. डॉ. प्रशांत पाटील, रोटे. डॉ. निलेश कोटेचा, रोटे. शैलेश खंडेलवाल, रोटे. सुयोग जैन यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. श्रीमती अरुणा उदावंत, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील, ईश्वर पाटील, उत्तमराव मनगटे, तसेच रोटे. डॉ. अमित साळुंखे, रोट.डॉ. समाधान वाघ, कुमारी ईश्वरी पाटील, व रोटे. शिवाजी शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
रोट. शिवाजी शिंदे यांनी उपप्रांतपाल रो डॉ गोविंद मंत्री यांचा परिचय करून दिला. उपप्रांतपाल रोटे. डॉ. गोविंद मंत्री यांनी प्रांतपाल यांच्या संदेशाचे वाचन यावेळी केले. रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी आगामी वर्षाच्या कालखंडातील विविध नियोजित उपक्रमांविषयी मनोगत व्यक्त केले. रोटे. शिवाजी शिंदे यांनी अध्यक्ष रोटे. डॉ. बाळकृष्ण पाटील यांचा परिचय करून दिला. या पदग्रहण सोहळ्याचे मुख्य आकर्षण, प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते रोटे. डॉ. सुजित परदेशी यांचा परिचय रोटे. नीरज मुनोत यांनी करून दिला. आपल्या 45 मिनिटांच्या विशेष उद्बोधनपर मनोगतात रोटे. डॉ. सुजित परदेशी यांनी नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, नियोजन व उपक्रमांची यशस्विता याबाबत प्रेरणादायी व्याख्यान दिले.
उपस्थित मान्यवरांना सस्नेहभेट दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. रोट शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नूतन सेक्रेटरी रोटे. प्रा.डॉ. पंकज शिंदे यांनी आभार मानले.
या पदग्रहण सोहळ्याला भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, निर्मल इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्षा वैशालीताई सूर्यवंशी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे संचालक संजय कुमावत, प्रदीप पाटील, न.पा. चे माजी उपमुख्यअधिकारी राजेंद्र पाटील, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, बाजार समितीचे संचालक संजय सिसोदिया, अग्रवाल एनएक्स चे संचालक रवी अग्रवाल, पियुष संचेती, डॉ कुणाल पाटील, JCI अध्यक्ष मयूर दायमा यांची विशेष उपस्थिती होती.
तर या प्रसंगी पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे डॉ. जवाहर संघवी, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, डॉ. आर बी तेली, डॉ. योगेन्द्रसिंह मोरे, डॉ. गोरख महाजन, उद्योजक रुपेश शिंदे, सुयोग जैन, डॉ. भूषण मगर, डॉ. सागर गरुड, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पवन पाटील, डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. मुकेश तेली, डॉ. रुपेश पाटील, अतुल शिरसमणे, रोहन पाटील, ॲड. योगेश पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. विशाल पाटील, रितेश ललवाणी, गोपाल पटवारी, डॉ. राहुल झेंरवाल, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. प्रमोद पाटील, रावसाहेब बोरसे, संजित पाटील, कृष्णा साळुंखे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे गोपाल पाटील, हर्षल, सचिन व संतोष यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.