जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ ११ जुलै रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शनिपेठेतील मलिक हाऊस येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात ५०० बाटल्या रक्तसंकलन झाले आहे. अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशन तसेच रेडक्रॉस सोसायटी, गोळवलकर, रेडप्लस तसेच एसबीटीसी या रक्त सोसायट्यांसह जिल्हा रुग्णालय या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर करीम सालार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णु भंगाले, महानगराध्यक्ष शाम तायडे, सुनील भंगाळे, महापालिकेचे विरोधी गटनेते सुनील महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार मनीष जैन, भगत बालाणी, विनोद देशमुख , नगरसेवक चेतन सनकत, अशोक लाडवंजारी, दिपक जोश, सलीम इनामदार, एटीएमचे सचिव आमीन भाई बाटलीवाला, उपाध्यक्ष सय्यद चॉंद साहेब, डॉक्टर सेलचे अध्यक्ष एस.आर,पाटील, अशोक पाटील, भूषण बोलतानी, अन्वर मुलतानी, सारा हॉस्पिटलेच डॉ. मीनाज पटेल, विकास पवार, शनिपेठ पोस्टेचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे, आदी उपस्थित होते. या शिबिरात अनेक पदाधिकार्यांनीही रक्तदान करुन सहभाग नोंदविला. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात जवळपास ५०० दात्यांनी रक्तदान केले. अब्दुल गफ्फार मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष एजाज मलीक, नदीम मलीक, फैसल मलीक यांनी सर्व रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.