जळगाव – लॉकडाऊन मुळे कुंटुब प्रमुख असलेल्या युवकाने आर्थिक विवंचनेतून जळगांव येथील सलून कारागीर तरुणाने आत्महत्या केली होती. याबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हा कार्यकारणीने आत्महत्या ग्रस्त सलून कारागीर कै. गजानन वाघ मूळ गाव (माळ पिंपरी ता.जामनेर) यांच्या घरी जाऊन कुटुंबाला धिर देत परिवाराचे सात्वन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हा कार्यकारणीने आत्महत्या ग्रस्त कै.गजानन वाघ यांच्या पत्नी सरला गजानन वाघ यांना तात्काळ आर्थिक मदत करून वाघ परिवाराच्या दुःखात सहभागी झाले.
कै.गजानन वाघ यांच्या पत्नी सरला गजानन वाघ यांना आर्थिक मदत करताना जळगांव जिल्हा अध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत दादा शिंदे, जिल्हा सचिव कुमार सिरामे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. संगीता ताई गवळी, राज्य कार्यकारणी सदस्य श्री. राजकुमार गवळी, जिल्हा सदस्य श्री. संजय सोनवणे, श्री योगेश (भैय्या) वाघ उपस्थित होते.