जळगाव – रोटरी परिवारात यंदा रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा समावेश झाला असून या क्लबच्या सन 2021- 22 या वर्षासाठी अध्यक्षपदी नितीन इंगळे, तर मानद सचिवपदी संदीप असोदेकर यांची निवड झाली आहे.
या क्लबचा पदग्रहण समारंभ 16 रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये पीडीजी राजीव शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. या क्लबच्या प्रेसिंडेंट ईलेक्टपदी डॉ. पंकज शहा, उपाध्यक्षपदी अजित महाजन, सहसचिवपदी श्रेया कोगटा, सार्जेंट अॅट आर्म अॅड.पुष्कर नेहेते, कोषाध्यक्षपदी सचिन चौधरी, तसेच कार्यकारिणी संचालक म्हणून लक्ष्मीकांत मणियार, डॉ. मूर्तझा अमरेलीवाला, राजीव बियाणी, श्रीराम परदेशी, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. श्रीधर पाटील यांचा समावेश आहे.
रोटरी इंटरनॅशनल ही संस्था अनेक दशकांपासून सामजिक उपक्रम राबवित आहे. याच अनुषंगाने रोटरी क्लब जळगाव ईलाईटचा सुद्धा शाळांमध्ये शुद्ध पेयजल, आदिवासी तांड्याचे पालकत्व, शाळा व वस्त्यांमध्ये वाचनालय, वैद्यकीय शिबिरे अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन काम करण्याचा मानस आहे.
या कार्यकारिणीने या प्रकारचे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने पदाधिकारी व सदस्य यांचे नियोजन सुरू झाले आहे.