Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोहिनूर अन दिलीप कुमार

by Divya Jalgaon Team
July 8, 2021
in जळगाव, मनोरंजन, सामाजिक
0
कोहिनूर अन दिलीप कुमार

जळगाव – दिलीप कुमार ऊर्फ मोहम्मद युसुफ़ खान भारतीय हिन्दी सिनेमाचे एक प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते होते. दिलीप कुमार त्यांच्या कारकीर्दीतील उत्कृष्ट अभिनेते होते. त्रासद भूमिके करिता ते प्रसिद्ध झाल्याने त्यांना ट्रेजेडी किंग ही संबोधले गेले. दिलीप कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनयाबद्दल सर्वोच्च सम्मान दादा साहेब फाळके पुरस्कार तसेच पद्म भूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानातील सर्वोच्च नागरिक सम्मान ‘निशान ए इम्तियाज’ पुरस्काराने ही सम्मानित केले होते. दिलीप कुमार वर्ष 2000 मध्ये राज्यसभेचे सदस्य ही राहिले होते

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी वर्तमान पाकिस्तान स्थित पेशावर शहरात झाला होता. त्यांचं बालपणीच नाव मोहम्मद युसुफ़ खान असे होते. त्यांच्या वडीलांचे नाव लाला गुलाम सरवर होते. जे फळ विक्री करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करीत असतं. फाळणीच्या वेळी ते परिवारासह मुंबईत स्थायीक झाले. त्यांचे सुरुवातीचे जीवन फार जिकिरिचे होते. वडिलांना फळ विक्रीच्या व्यवसायात तोटा झाल्याने युसुफ खान पुण्याच्या एक कॅन्टीन मध्ये काम करू लागले. इथेच देविका राणींनी त्यांना पाहिलं आणि त्यांनी युसुफ खान यांना अभिनेता बनवलं. देविका राणी यांनी युसुफ़ खान या नावाच्या ऐवजी दिलीप कुमार असे त्यांचे नाव ठेवले. अशा रितीने वयाच्या पंचवीशीत दिलीप कुमार नंबर एक अभिनेता म्हणून स्थापित झाले.

दिलीप कुमार यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी वर्ष 1966 मध्ये झाला. विवाहाच्या वेळी दिलीप कुमार 44 वर्ष तर सायरा बानो केवळ 22 वर्ष वयाच्या होत्या.

दिलीप कुमार यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे केली होती. ज्वारभाटा 1944 मध्ये रिलीज झाला. त्यांचा सर्वात हीट झालेला पहिला चित्रपट ‘जुगनू ‘ होता. 1947 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने ब़ॉलीवूड मध्ये दिलीप कुमार यांना हिट चित्रपटांचा स्टार म्हणून ख्याती मिळवून दिली. 1949 मध्ये अंदाज मध्ये दिलीप कुमार यांनी प्रथमच राजकपूर यांच्या सोबत काम केले. हा चित्रपटही फार हीट झाला होता. त्यांनतर ‘दीदार ‘ (1951), ‘देवदास ‘ यातील गंभीर भूमिकांमुळे दिलीप कुमार फार लोकप्रिय झाले आणि त्यांना ट्रेजेडी किंग म्हटले जाऊ लागले. ‘मुगल -ए -आज़म’ मधील मुगल राजकुमार सलीमची भूमिका ही त्यांनी फारच उत्कृष्टपणे निभावली. त्यानंतर दिलीप कुमार यांचे ‘राम और श्याम’, मधुमति, गंगा जमुना, कर्मा, क्रांति, इज्जतदार, सौदागर अशा एकाहून एक सरस चित्रपट आले आणि दिलीप कुमार यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

गंभीर भूमिका साकारून
अभिनेता ते प्रेक्षकांकडे वळणारे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने ते कायम स्मरणात राहतील .

हिंदी सिनेसृष्टीने अनेक कलाकारांना घडवले पण दिलीप कुमार अशे अभिनेता होते ज्यांची गोष्टच वेगळी होती . आज रोजी ब्लाॅक बस्टर अभिनेता, ट्रेजेडी किंग दिलीप कुमार आपल्यातून निघुन गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

– आरिफ आसिफ शेख, जळगाव

Share post
Tags: #Arif shaikh#dilip kumar#कोहिनूर अन दिलीप कुमार
Previous Post

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुंटुबाची भेट घेऊन केले सात्वंन

Next Post

इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव तर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

Next Post
इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव तर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव तर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group