जळगाव – रोटरी क्लब ऑफ भुसावळ चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री विलास भाटकर तसेच तहसीलदार दीपक धिवरे तसेच सह प्रांतपाल रो. संगीता पाटील व सर्व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. सदरचा क्लब हा भुसावळ शहरातील सर्वात जुना क्लब असून सदर क्लब ची स्थापना 1952 या वर्षी झालेली असून, सदर वर्ष 70 वे वर्ष आहे. या वर्षकरिता क्लबचे अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र कुमार फेगडे यांनी रोटेरियन गजानन ठाकूर यांच्याकडून पदभार घेतला व रोटेरियन डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्याकडून सचिव म्हणून श्री राजेंद्र पाटील यांनी पदभार घेतला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी यांनी क्लबला शुभेच्छा देताना रोटरी क्लब चे माध्यमातून चांगले काम करावे त्यामध्ये शिक्षणीक महिला सबलीकरण समजभिमुख कामे करण्यास प्रशासन मदत करण्यास तयार राहील अशी ग्वाही दिली. तसेच वर्षभरामध्ये चांगले प्रोजेक्ट राबविण्याठी शुभेच्छा दिल्यात. तसेच तहसीलदार म. धिवरे यांनी कार्यक्रमास येऊन नवीन टीम ला शुभेच्छा दिल्यात व प्रशासनाची काही मदत लागल्यास प्रशासन अवश्य देण्यास तयार आहे. असे सांगितले तसेच सह प्रांतपाल रो. संगीता पाटील यांनी रोटरी क्लब समाजाच्या सेवेसाठी असून यामधील प्रत्येक घटकाने समाजासाठी काही देणे त्यासाठी कटिबद्ध राहून महिला सबलीकरण शिक्षण व पर्यावरण पूर्वक काम करावे, तसेच अध्यक्ष हे प्रशासनातील असल्याने त्यांनी प्रशासनाचा उपयोग करून चांगले कार्य करावे यासाठी मी शुभेच्छा देत आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. हेमंत नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन रो. आरती चौधरी यांनी केले सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ चेअध्यक्ष श्री आप्पासाहेब सोनवणे व पदाधिकाऱ्यांनी रोटरी क्लब साठी रुपये 11000 ची मदत केली व चांगल्या कामासाठी व प्रोजेक्ट करीता आमचे नेहमी सहकार्य राहील असे सांगितले. तसेच पास प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी सुद्धा रोटीच्या कामासाठी 11000 रुपयाची देणगी दिली. व भविष्यात काही काम असल्यास मी मदत करण्यास तत्पर आहे असे सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी साठी रोटरी चे कर्मचारी मनोज गुलाईकर यांनी व सर्व रोटरीअन यांनी परिश्रम घेतले.