मुंबई वृत्तसंस्था – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. खडसे यांना उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यापुर्वी एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने आज अटक केली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान या पोठोपाठ एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे.