जळगाव – रोटरी जळगाव ईस्टतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ झाला. या शिबिरात टप्प्या टप्प्याने रुग्णांची तपासणी करुन मू.जे.महाविद्यालयाच्या रोडवरील विवेकानंद नेत्रालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.पंकज शहा व त्यांचे सहकारी करीत आहेत.
या प्राजेक्टचे चेअरमन डॉ.अमेय कोतकर असून प्रायोजक सुशील आसोपा आहेत. या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता यांनी केले. शिबिर यशस्वितेसाठी संजय गांधी, विनोद पाटील, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ.राहुल भंसाळी, डॉ.दर्शना शहा, संग्रामसिंग सूर्यवंशी, अमर चौधरी, राजेश साखला करीत आहेत. गरजूंनी ८०८७९५७६२२ या मोबाइल नंबरवरील व्हॉटसअपवर फक्त रुग्णांची माहिती पाठवा, असे कळविण्यात आले आहे.