पाचोरा (निलेश मराठे) – गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मैत्रय कंपनीतील गुंतवणूकदारांचे रखडलेले प्रश्न आता हळूहळू मार्गी लागण्याची चाहूल लागली असून ठेवीदारांना कायद्यानुसार परतावा मिळणे बाबत गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपास्थिती मध्ये पाचोरा भडगाव मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील व एकूणच महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या परताव्या संदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून दि.७ रोजी सकाळी १२.४५ वा. मंत्राललयातील तिसरा मजल्यावरील विस्तारित इमारत दालन क्र.३१९ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आ.किशोर अप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यापूर्वी दि १२ जानेवारी २०२१ रोजी शंभूराजे देसाई यांनी याबाबत बैठक घेऊन संबंधितांना निर्देश दिले होते. दरम्यानच्या काळात प्रशासनाने याबाबत केलेला पाठपुराव्याची ते माहिती जाणून घेणार आहेत.बैठकीला पोलीस आयुक्त नाशिक, पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा मुंबई तसेच उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ( मैत्रय ग्रुप) मुंबई शहर यांना यापूर्वी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ,सविस्तर कागदपत्र, टिपण्णी, शासन निर्णय व अधिसूचना आदी माहिती घेऊन उपस्थित राहण्याबाबत त्यांना आदेशीत केले असून या महत्वपूर्ण बैठकीकडे ठेवीदारांच्या नजरा लागून आहेत.
दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी आमदारकीच्या दुसऱ्या वेळी देखील राज्यभरातील गुंतवणूक दारांचे हक्काचे पैसे परत मिळावेत या साठी वरिष्ठ पातळीवर सततचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून आजच्या बैठकीतील निर्णयाकड़े संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
आ.किशोर अप्पा पाटील
मैत्रय मधील गुंतवणूकदारांना आपल्या हक्काच्या पैशांचा परतावा कायदेशीर पद्धतीने मिळावा यासाठी मी सन२०१६ पासून प्रयत्नशिल असून उद्याच्या बैठकीत गुंतवणूकदारांची बाजू पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडणार आहे. महाविकास आघाडीचे शासन सर्वांना न्याय देईल असा विश्वास आहे.