चाळीसगाव – आय सी आय सी आय फाउंडेशन चाळीसगाव व कृषी विभाग आणी शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान यांच्या सयुंक्त विद्यमानाने “पोषक परसबाग” या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करुण प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी कृषी सहायक श्री.तुफान खोत यांनी परसबागेचे महत्व व विषमुक्त अन्न यावर मार्गदर्शन केले , त्याची दैनंदिन जीवनात लागणारी गरज पटवुन दिली व आयसीआयसीआय फाउंडेशनचे चालणारे उपक्रम याबद्दल आपले सखोल असे मनोगत व्यक्त केले, तसेच आय.सी.आय.सी.आयह फांऊंडेशन चे विकास अधिकारी गणेश बोरगे व समन्वयक प्रविण भंडारे यांनी परसबाग कशी असावी यांचे प्रात्यक्षिक मोकळ्या जागेत करुण दाखवले व त्याच बरोबर पालेभाज्या, फळभाज्या,वेलीवगीनी कश्या पद्धतीने लागवड करावी याबद्दल मार्गदर्शन केले 50 परसबाग किट वाटप केली.
शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान चे तालुका समन्वयक राहुल राठोड यांनी जलसंधारण कामा विषय सोबत चर्चा केली. पिक विमा प्रतिनिधी राहुल पाटील यांनी देखील मार्गदर्शक केले. जुनोने गावाचे सरपंच गोरख राठोड यांनी आभार व्यक्त केले. महिला व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.