चाळीसगाव – विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणारा वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून सातशे वर्षे पासून वारकरी संप्रदायाने कीर्तनकार, प्रवचनकार तसेच वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्माचा विचार मनामनात रूजविला आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी असलो तरी आध्यात्म आणि विज्ञान जाणून आहे.
यंदा पायीवारी करणे शक्य नसल्याने प्रत्येकाच्या मनात दुःख आहे परमात्मा पांडुरंगाच्या ओढीने सर्वांचे मन व्याकुळ झाले असले तरी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची जतन करणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी कोरोनाची काळजी घेत, आहे त्या ठिकाणी परमात्म्याचा जागर करुन भक्तीभाव व्यक्त करावा. अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज चाळीसगाव शहरातील सुवर्णकार मंगल कार्यालयात गेल्या ४६ वर्षांपासून सुरू असलेल्या पंढरपूर पायी वारीच्या मुक्कामाची आठवण प्रसंगी प्रवचन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील बोलत होते. यावेळी श्री क्षेत्र सुकेश्वर संस्थांनचे अध्यक्ष श्री सदगुरु नामदेव महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष प्राचार्य विजय भामरे रवंजेकर, भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज, रामायणाचार्य लीलाधर महाराज श्रीक्षेत्र म्हसावद चे हभप चंद्रकांत महाराज, श्रीक्षेत्र मेहुण हभप जितेश महाराज यांचा सत्कार खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक निलेश सराफ, सोमनाथ सराफ, प्रभाकर बाविस्कर, पद्माकर विसपुते, नगरसेवक गणेश महाले, अजिंक्य बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते बंडूदादा पगार,बाबुराव बाविस्कर, साधना आहीरराव, प्रभावती आहिरराव,पद्मजा बाविस्कर , रामू सोनार यांच्यासह भाविक उपस्थित होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून ग्रंथपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर यांनी तर आभार राम कुलथे यांनी व्यक्त केले. दिंडीचे यजमान शामराव अहिरराव यांचा देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रवचनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.