जळगाव – एका कन्स्ट्रक्शन कंपंनीच्या इंजिनियरकडून २ लाख ५८ हजारांची लाच मागणाऱ्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला धुळे लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून अटक केली असून यामुळे खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तकारदार हे धुळे येथील रहिवाशी असुन ते धुळे येथील कस्ट्रकशन कंपनीतसाईट इंजिनियर असुन ते सदर कंस्ट्रकशन कंपनीची कामे व कंपनीचा आर्थिक व्यवहार पाहतात.
नंदुरबार येथील एका कंस्ट्रकशन कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग,अमळनेर यांचे कडुन आदिवासी मुलोंच्या वस्तीगृहाच्या बांधकामाचा ठेका घेतला असुन सदरचे काम तकारदार नोकरीस असलेल्या धुळे येथील बांधकाम कंपनीने करारनामा करुन घेतले आहे.सदर आदिवासी मुलींच्या वस्तीगृद्दाच्या आतापावेतो झालेल्या बांधकामाचे बिल कस्ट्रकशम कंपनीस अदा केल्याच्या मोबदल्यात दिनेश पाटील ,उपविभागीय अभियंता यांनी तकारदार यांच्याकडे बिलाच्या २ प्रमाणे लाचेची मागणी केल्याची तकार अँन्टी करप्शन ब्युरो, धुळे कार्यालयाकडे दिली होती.
तकारदार यांच्या तकारीची दि.८ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केंली असता दिनेश पाटील,उपविभागीय अभियंता (वर्ग १) यांनी स्वत:साठी व त्यांचे सहकारी कनिष्ठ अभियंता गांधीलकर यांच्यासाठी असे एकुण २,५८,०००/– रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधीलकर यांनी दिनेश पाटील, उपविभागीय अभियंता यांना तकारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयाचे कलम ७ ब ९२ प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असून, आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षकसुनिल कुराडे व पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक श्री.मंजितसिंग चव्हाण तसेच जयंत साळवे,कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडिले, पुरुषोत्तम सोनवणे,संदीप कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, महेशमोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.