चोपडा – ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी: छोटू वारडे चोपडा (प्रतिनिधी) राज्यात गौरवलेले, चोपडा शहरातील सुशांक डिजिटल चे संचालक प्रसिद्ध छायाचित्रकार भगवान भावलाल वारडे यांना ग्राहक उपभोक्ता समितीच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे,जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप सुरवाडकर,जिल्हा सचिव रावसाहेब जगताप,मुकुंद केदार यांनी दिलेल्या पत्राद्वारे सदर निवड करण्यात आली आहे. कुपोषण निवारण व कोरोना योद्धा म्हणून शासनाने याआधीच सामाजिक कार्यकर्ते असलेले छोटू वारडे यांना याआधी गौरविले आहे. सामाजिक आस्थेची जाणीव ठेवून ग्राहक उपभोक्ता समितीनं त्यांची निवड केली आहे.त्यांच्या या नियुक्तीने फोटोग्राफर असोसिएशन पत्रकार महासंघ व बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा चोपडा यांनी कौतुक केले आहे.