जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयातर्फे १ जुलै रोजी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांचा सत्कार करण्यात आला. फिजीयोथेरपी विद्यार्थी संघटनेसह प्रशासन प्रमुख राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांच्यासह डॉ.चित्रा, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.साकिब, डॉ.अनुराग मेहता, डॉ.भवानी राणा, डॉ.निखील पाटील, डॉ.मुकेश शिंदे, डॉ. सुवर्णा, डॉ.प्रज्ञा, डॉ.चैताली नेवे, डॉ.श्रृती चौधरी, डॉ. सायली पारेख आदि उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्टुडंट असोसिएशन ऑफ फिजीयोथेरपी – सॅपचे प्रेसिंडेट सौरभ पाटील, व्हा.प्रेसिंडेट आरती अग्रवाल, जनरल सेके्रटरी ओंकार चाबरा, जॉईंट सेक्रेटरी तेजस्विनी व्यंकटवार यांनी परिश्रम घेतले.