जळगाव – रावेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या .विशेष म्हणजे डॉक्टर दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम (ता.१) झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पाल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी बिन टाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 29 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.
यासाठी पाल ग्रारुचे वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. विजया झोपे (खिरोदा ), डॉ. नीरज पाटील (लोहारा ), डॉ. चंदन पाटील (निंभोरा ), डॉ. मोरे (थोरगव्हाण ), अनुपम अंजलसोंडे (वाघोड), डॉ. योगेश उंबरकर (लोहारा) यांच्यासह समन्वयक रामभाऊ पाटील, महेमूद तडवी यांच्यासह सर्व परिचारिका, कक्षसेवक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पाल ग्रामीण रुग्णालयाला एक आयडियल रुग्णालय सर्वांनी मिळून बनवू या. अधिकाधिक सुविधा उपलब्ध करवून देवू असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी नागरिकांना दिले.