जळगाव – घरातील व्यक्तींना शौचालयाला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना आज २ जुलै शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारातील रेल्वेगेटजवळ घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समाधान मुलचंद कोळी वय २८ रा. वाल्मिक नगर, असोदा ता.जि. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, समाधान मुलचंद कोळी चायनीज विक्रीचे गाडी लावून आपल्या आई वडिलांसह उदरनिर्वाह करीत असून त्याचे आई वडील शेती सांभाळतात. समाधान हा शौचालयाला जाऊन येतो असे घरातून सांगत दुचाकीवर बाहेर पडला. असोदा रेल्वे गेट पासून एक कीलोमीटर अंतरावर पाच मोरी असोदा शिवार जवळ खंबा नं. 423/1 डाऊन धावत्या रेल्वे खाली येऊन आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.
याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहे .