जळगाव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे म्हणुन भरारी फाऊंडेशन शेतकरी संवेदना अभियान हाती घेतले आहे.
अलीकडच्या काळात देशभरात विविध अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतकरी बांधवांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावर मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. कुटुंबाने काय करावे हे त्यांना सुचत नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भरारी फाऊंडेशन ने शेतकरी संवेदना अभियान सुरु केले आहे. अनेक शेतकरी आज ही आर्थिक विवंचनेत आहेत. मुलामुलींचे लग्न, शिक्षण, सावकारी कर्ज, दुष्काळी परिस्थिती, लहरी निसर्गाचा फटका अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते आणि शेतकरी आत्महत्या करतो.
११४ गावातील ३० हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे
भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील ११४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तीस हजार शेतकऱ्यांना भेटुन हा सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजु व अडचणींत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणे, बी बियाणे उपलब्ध करून देणे, तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, मुलामुलींचे लग्न व शिक्षणासाठी मदत करणे अशा प्रकारे शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम संस्था करत आहे.
समुपदेशनसह जोडधंद्यासाठी सहकार्य
आनंदा मंजा अहिरे वय – ४७ वर्ष रा.विटनेर, ता.पारोळा हा शेतकरी मागील वर्षापासून खुप तणावपूर्ण जीवन जगत आहे. पत्नीचं आजारपण, दोन मुलांचं शिक्षण, घरी एक एकर शेती, सावकारी कर्ज, दुसऱ्याच्या शेतात काम करुन घर चालविणे अशी सर्व परिस्थिती आहे. त्या शेतकऱ्याचे गेल्या तीन महिन्यांपासून समुदेशन केले. शेतकरी वाचला पाहिजे, त्याची आर्थिक विवंचनेतून सुटका व्हायला हवी यासाठी भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार कृषि दिनानिमित्त ३५ हजार किमतीच्या सहा शेळ्या त्याला देण्यात येत आहेत जेणेकरुन तो आर्थिक सक्षम होईल व त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येणार नाही. जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम वय-३४ हा शेतकरी आर्थिक अडचणीत असून शेतातील पिकांना खते व कीटक नाशके घेण्यासाठी पैसे नसून अशा शेतकऱ्याला खते बी बियाणे व कीटकनाशके देण्यात आले.
तीन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले
जळगांव जिल्हयात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या असुन, जळगाव जिल्ह्यातील आतपर्यंत तीन शेतकऱ्यांना शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून आत्महत्या करण्यापासून आपण रोखू शकलो आहे. असे खूप शेतकरी आहेत जे अडचणींत असुन आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. अशा शेतकऱ्यांना शोधून आत्महत्या थांबविणे हे भरारी फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. कोरोणाच्या काळात घरचाकरता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी निराधार महिलांना स्वयंरोगाराला चालना देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे गावं- शिरसोली वय – २८ वर्षे व सुरेखा अनिल चव्हाण वय- ४१ वर्षे गावं- जळगांव यांना शिलाई मशिन भरारी फाऊंडेशन तर्फे देण्यात येत आहे. या अभियानासाठी सचिन महाजन, दीपक परदेशी, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व निलेश जैन हे परिश्रम घेत आहेत. संपूर्ण अभियानाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा निवासी अधिकारी राहुल पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, के.के.कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी, स्पार्क ईरीगेशनचे रविंद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, लक्ष्मी एग्रो च्या संचालिका संध्या सुर्यवंशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भट, अनिल कांकरिया, पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, किशोर ढाके, उद्योजक सपन झूनझूनवाला, योगेश पाटील, निलेश झोपे उपस्थित होते. व या मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.