जळगाव – जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर खानदेशातील सर्वात जुनी, नावाजलेली एकमेव उर्दू माध्यमाची संस्था म्हणजे अंजुमन तालीमुल मुस्लिमीन अर्थातच अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जळगाव च्या सचिव पदी एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील व वक्फ बोर्ड खाली नोंदणीकृत मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट जळगाव तर्फे गौरव करण्यात आला. शाल, पुष्प गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, उपाध्यक्ष मुश्ताक अली सय्यद व रियाज मिर्झा, सचिव फारुक शेख, सहसचिव अनिस शाह व मुकीम शेख, कोषाध्यक्ष अश्फाक बागवान, संचालक मझर खान, नजीर मुलतानी, ॲडव्होकेट सलीम शेख, आदींची उपस्थिती होती.
मलिक यांना इकरा संस्थेची घटना फारुक शेख यांनी दिली सप्रेम भेट
एजाज मलिक हे इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव झाल्याने त्यांना फारुक शेख जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष यांनी इकरा सोसायटीचे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन ची प्रमाणित प्रत भेट देऊन आपण या घटनेनुसार आपल्या संस्थेचे कार्यभार सांभाळतील, घटनाबाह्य, नियमबाह्य, व बेकायदेशीर कोणतेही कार्य स्वतः करणार नाही व इतरांना सुद्धा करू देणार नाही या पद्धतीने आपण कार्य कराल अशी अपेक्षा फारुक शेख यांनी एजाज मलिक यांना घटना देऊन व्यक्त केल्या.
कारण या पूर्वी २०१२ व १३ वर्षी इकराचे दोन विश्वस्त अध्यक्ष व तत्कालीन सचिव यांच्यावर गुन्हा नोंद होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तर नव्याने जे चार विश्वस्त घेण्यात आले त्यातील एकावर सुद्धा ता पूर्वीच संस्थेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद असून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. म्हणून असा प्रकार भविष्यात घडू नये म्हणून काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा देण्यात आला असता एजाज मलिक यांनी सुद्धा त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच मी घटनाबाह्य कार्य करणार नाही, व करू देणार नाही परंतु असे होत नसेल तरी लक्ष देईल असे अभिवचन दिले.