जळगाव – ‘ओबीसी के सन्मान मै भाजप मैदान में ‘अशा घोषणाबाजी करून आज भाजपतर्फे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरून आज दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते.
खा. रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे,जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील,दीपक सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.